कुरखेडा : विवाहित इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

813

The गडविश्व
कुरखेडा, १७ ऑगस्ट : तालूक्यातील जांभूळखेडा येथील विवाहित इसमाने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल मंगळवार १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. निलेश नकटू कवरके (४२) असे मृतकाचे नाव आहे.
कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथील मृतक निलेश नकटू कवरके याने काल कुटुंबातील व्यक्तीची नजर चूकवत स्वतःच्या बेडरूम मध्ये गळफास घेतला. सदर बाबा कूटूंबातील सदस्यांना माहिती होताच आरडा ओरड करीत शेजाऱ्यांच्या मदतीने गळफासाची दोरी सोडत त्याला खाली उतरवले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती तात्काळ कुरखेडा पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलीस हवालदार मधूकर बारसागडे व मनोहर पूराम यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास कुरखेडा पोलिस करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here