कुरखेडा येथे विदर्भ विकलांग संघटनेची बैठक संपन्न

88

The गडविश्व
गडचिरोली : आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडाच्या महात्मा गांधी सभागृहामध्ये काल ७ मार्च रोजी विदर्भ विकलांग संघटनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीला कुरखेडा तहसिल कार्यालयाचे संजय गांधी निराधार योजनेचे विभाग प्रमुख चकोले, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडाच्या संस्थापक संयोजीका शुभदाताई देशमुख, विदर्भ विकलांग संघटनेचे अध्यक्ष यशवंत पाटणकर, तालुका अपंग संघटना कुरखेडाचे अध्यक्ष प्रल्हाद बन्सोड, सचिव भारती नंदेस्वर, संगती शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा मालुताई भोयर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजना, अंतोदय योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी अपंग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आदी योजनाविषयी माहिती देऊन प्रत्येकांनी या योजनेसाठी लागणाऱ्या कागद पत्राची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावे असे कुरखेडा तहसिल कार्यालयाचे संजय गांधी निराधार योजनेचे विभाग प्रमुख चकोले यांनी आवाहन केले. त्याच प्रमाणे दिव्यांग व्यक्तीच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवितो तसेच शासन निर्णयाचा पुरवठा करतो परंतु गावपातळीवर कार्य करणाऱ्या यंत्रणेजवळ शासन निर्णय अजूनही पोहचलेले नाही, या एवढी दुर्दैवी दुसरी कोणतीच बाब नाही. २०१८ च्या शासननिर्णयामध्ये दिव्यांग व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजना दिलेल्या आहेत त्यांची अमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याने दिव्यांग व्यक्तींना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे हा दिव्यांग व्यक्तीचा पराभव नाही तर वंचित घटकांना परत वंचित करणाऱ्या शासन यंत्रणेचा पराभव आहे असा सूर विदर्भ विकलांग संघटनेच्या बैठकीमध्ये होत होता.
तसेच या बैठकीमध्ये दिव्यांग व्यक्तींना मिळणारा मानधन हा महिण्याच्या १० तारखेच्या आत इतर कर्मचाऱ्याप्रमाणे बँक खाते जमा करण्यात यावा मिळणाऱ्या मासिक मानधनाच्या रक्कमेत वाढ करण्यात यावी, दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ देताना जाचक अटी शिथिल करण्यात यावे, उदा. पूर्वी मिळलेल्या २८ हजार रुपये निम्या रक्कमेच्या घरकुलाचा विचार कुरून जीर्ण घर झालेल्या दिव्यांग व्यक्तींना नवीन घरकुल देण्यात यावे, २ आक्टोंबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार पिडीत महिलांना मनोधैर्य योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावे तसेच १७ जून २०१३ च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींना अंतोदय योजनेचा लाभ देण्यात यावे, विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ लाभार्थीयांना त्वरित येण्यात यावे, दिव्यांग व्यक्ती विषयी असलेल्या योजना, कायदे, प्रकार याविषयी ग्रामपंचायत मध्ये नोंदणी होणे अनिवार्य आहे आदींविषयी चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here