कुरखेडा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

140

The गडविश्व
कुरखेडा, ३० ऑगस्ट : स्थानिक श्रीराम उत्सव समितीच्या वतीने श्रीराम मंदिर श्रीराम नगर, कुरखेडा येथे सार्वजनिक तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. सदर तान्हा पोळा महोत्सवात भव्य वेशभुषा नंदीबैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परीषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये होते. र्धेमध्ये पारस झोडे, सोहम बन्सोड, माही साहाळा, त्रिशिका कुथे, निधी टेंभुळकर, राम नागपुरकर, जानव्ही बोरकर, आदित्य बोले, सुशांत गजभिये, गोकुले हरडे, आशय गावंडे, वेदिका भेले, प्रथम गजभे, मितेश पवार आदिना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. यात विजेत्या स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराज ‘अ’ गट ८ ते१४ वर्षावरील गटामध्ये प्रथम बक्षिस ११,१११ रोख व चषक, दितीय बक्षिस ७,७७७ व चषक, तृतीय ४,४४४ व चषक तसेच डाँ बाबासाहेब आंबेडकर १ ते ७ वर्ष पर्यत च्या गटात प्रथम ७,७७७ , दितीय ४,४४४, तृतीय ३,३३३ रूपयांचे पुरस्कार देण्यात आले. तसेच दोन्ही गटात १,१११ रु प्रोत्साहनपर बक्षिस ८ स्पर्धकांना देण्यात आले. सहभागी बालगोपालांना हासुरे अंकलिपी प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दोषहरराव फाये, सामाजिक कार्यकर्ते विलास गावंडे, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, नगर परिषद सभापती अँड. उमेश वालदे, प्रतिष्ठित व्यापारी विजय झंवर, सेवानिवृत्त प्राचार्य चैतराम दखने, पत्रकार संघाचे सचिव नासिर हाशमी, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, मुरलीधर देशमुख, डॉ. बाबुलाल कावळे सहारे, आशाताई बानबले, सुधाताई नाकाडे, दुर्गाताई गोटेफोडे, अल्काताई गिरडकर, अतुल झोडे, उल्हास देशमुख, दामोधर उईके, गितेश्वर उईके, नगरपंचायत सभापती गौरीताई उईके, सागर निरकांरी व प्रतिष्ठित मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
स्पर्धेचे परिक्षक म्हणून नरेश मांडवे, खुशालराव फुलबांधे, रश्मीताई सोनवाणे, रश्मी मोगरे, प्यारेलाल दाऊदसरे, धम्मप्रिया टेंभुळकर होते. प्रास्ताविक चांगदेव फाये व संचालन विनोद नागपुरकर तर आभार अतुल झोडे यांनी मानले. यस्ववीतेसाठी गुणवंत फाये, नागेश फाये, मनिष फाये, उल्हास महाजन, देवेंद्र फाये, विनोद नागपुरकर, राहुल गिरडकर आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here