कुरखेडा : कुंभीटोला येथे गाव समिती व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ स्पर्धा संपन्न

237

– चिमुकल्या मध्ये दिसला उत्साह
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २८ सप्टेंबर : तालुक्यातील कुंभीटोला येथे गाव समिती व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने काल २७ सप्टेंबर रोजी ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “दारू व तंबाखू पासून मुक्तीसाठी धावूया ही या स्पर्धेचा माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखू विक्री मुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. संघटना बनवून पुढे कृती करावी व गाव दारू विक्री मुक्त करावे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. याच उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने एक दिवसीय गाव पातळी व्यसन उपचार शिबीर व मुक्तिपथ मॅरेथॉन कार्यक्रम अंतर्गत दारू व तंबाखू पासून मुक्ती साठी धावू या या स्पर्धेच्या माध्यमातून युवक, युवती, महिला व पुरुष यांच्याकरीता धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. महिला, युवक, युवती व पुरुष असे मिळून एकूण ३० जणांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी चिमुकल्या मध्ये उत्साह दिसून आला.
स्पर्धेची सुरवात तंमुस अध्यक्ष किशोर भांडारकर यांच्या हस्ते करण्यात आली. उपस्थित सर्व स्पर्धक व गावकरी यांनी सकाळी ११.०० वाजता दारू व तंबाखू मुक्तिचा सुरवातीला संकल्प घेतला. ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली. दरम्यान चारही गटातून तीन-तीन विजेते निवडण्यात आले व विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बक्षीस सह मेडल तसेच जिल्हाधिकारी व डॉ. अभय बंग यांचे सहीचे प्रमाणपत्र, व मेडल इत्यादी देण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मुक्ती पथ चे मयूर राऊत,व कान्होपात्रा राऊत यांनी केले. सदर स्पर्धा बघण्यासाठी गावातील महिला, बाल गोपाल यांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवली व इतर गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here