कुरखेडा : अतिक्रमणामुळे वार्ड जलमय, नागरिकांनी केला चक्काजाम

441

The गडविश्व
कुरखेडा (Kurkheda ) १३ सप्टेंबर : शहरातील विद्यानगर व श्रीरामनगर परिसरात अनेक समस्या निर्माण होत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे व मुसधार पावसाने दोन्ही वार्ड जलमय झाले होते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कुरखेडा- देसाईगंज मार्गावर तब्बल तीन तास चक्काजाम केल्याचे दिसले.
शहरातील विद्यानगर नाल्यावर अतिक्रमणक करून शॉपिंग कॉम्पलेक्सचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग विरूध्द दिशने होत वार्डात जात असल्याने वार्ड जलमय झाले. याबात यापुर्वी प्रशासनाला सूचन देवूनही कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त नागरिकांनी काल १२ सप्टेंबर ला सकाळी दहा वाजतापासून कुरखेडा- देसाईगंज मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. जिल्हयात मुसळाधार पावसाने हजेरी लावल्याने जिकडे तिकडे पुरपरिस्थितील निर्माण झाली. कुरखेडा येथे सुध्दा मुसळधार पावसाने विद्यानगर व श्रीरामनगर येथे पुरपरिस्थिती निर्माण झाली. देसाईगंज मार्गावर असलेल्या नाल्यावर अतिक्रमण करून शॉपिग कॉम्पलेक्स बांधले यामुळे नाल्यामधून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह विरूध्द दिशेने जात सदर पाणी विद्यानगर व श्रीरामनगर परिसर जलमय होतो असा नागरिकांचा आरोप आहे. अनेक दिवसापासून अतिक्रमण हटवून पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी नागरिकांनी केली होती मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसले. पुन्हा काल परिसर जलमय झाल्याने नागरिकांनी कुरखेडा- देसाईगंज मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी तहसीलदार सोमनाथ माळी, ठाणेदार अभय आष्टेकर, वनपरिक्षेत्रअधिकारी कुंभलकर आदींनी आंदोलकांशी चर्चा केली व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र आदोंलक काहीच ऐकण्याच्या मानसीकतेत नसल्याने त्वरीत जेसीबी बोलावत अतिक्रमण बांधकामासमोरील काही भाग मोकळा करीत पाणी वाहण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. तसे न केल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आदोंलकर्त्यांंनी दिला.

(gadchiroli, kurkheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here