कुणबी समाज संघटना तर्फे विध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष दीपक जवादे यांचा सत्कार

244

The गडविश्व
ता.प्र / सावली : कुणबी समाज संघटना तालुका सावलीच्या कार्यकारणी मंडळाची मिटींग ११ जून २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. त्या प्रसंगी कुणबी समाज संघटनेचे कोषाअध्यक्ष दीपक जवादे यांची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व्याहाड खुर्द चे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल कुणबी समाज संघटना तालुका सावलीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
याप्रसंगी कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष अर्जुनजी भोयर, उपाध्यक्ष अनिलजी मशाखेत्रि, सचिव सौ. उषाताई भोयर, सदस्य कवींद्रजी रोहनकार, भाऊजी कीनेकर, किशोर घोटेकर, दौलत भोपये, किशोर वाकुडकर, टीकाराम रोहनकार, गिरीधर काटवले राजेंद्र भोयर व समस्त कुणबी समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here