‘काचा बादाम’ फेम भुबन बड्याकार यांचा अपघात

498

– गंभीर दुखापत झाल्याने प्रकृती चिंताजनक
The गडविश्व
बीरभूमी : काचा बादाम’ गाण्यामुळे रातोरात स्टार झालेले भुबन बड्याकार यांचा काल सोमवारी रात्री पश्चिम बंगालच्या बीरभूमी येथे त्यांच्या कारला अपघात झाला. त्यानंर भुबन यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाल्यानं प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या अपघाताच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांचे चाहते त्यांची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
भुबन बड्याकार यांनी काही दिवसांपूर्वीच एक कार खरेदी केली होती. कार चालवायला शिकत असताना त्यांचा अपघात झाला अशी माहिती मिळत आहे. तसेच भुबन यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याचेही बोलले जात आहे. सध्या त्यांना बीरभूमीमधील सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here