कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे भाव वधारले

339

The गडविश्व
मुंबई : युक्रेन-रशिया मध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे पेट्रोलियमच्या किंमती वाढतच आहेत. त्यामध्ये आता कमर्शियल सिलिंडर भाववाढीची भर पडली आहे. आज १ मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. सिलिंडरच्या दरात १०५ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.
दरवाढीमुळे आज मंगळवारपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यवसायिक सिलेंडरची किंमत २,०१२ रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर ५ किलोच्या सिलिंडरच्या दरातही २७ रुपयांची वाढ झाली आहे. आता दिल्लीत ५ किलोच्या सिलेंडरची किंमत ५६९ रुपये असेल.
घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर जैसे थे असून सध्या कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०२ डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. व्यवसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२१ ते १ फेब्रुवारी २०२२ दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत १७० रुपयांनी वाढ झाली आहे. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here