ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा : ओबीसी राजकीय आरक्षण देण्याच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी

466

The गडविश्व
मुंबई : राज्यातील आरक्षणाच्या 50 टक्क्यांच्या मर्यादेत राहून ओबीसी राजकीय आरक्षण देण्याच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली आहे त्यामुळे आता राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे..ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका नकोत असे राज्य सरकारने एक विधेयक मंजूर केले होते. त्यावर आता राज्यपालांची सही झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी दिली आहे .
जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यातील निवडणुका घेऊ नयेत आणि 50 टक्क्यांच्या मर्यादेत राहून ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात यावे अशा आशयाचे विधेयक महाविकास आघाडीने मंजूर करुन घेतले होते. हे विधेयक दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आले होते आणि अंतिम मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता. आता त्या विधेयकावर राज्यपालांची सही झाल्याने ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ओबीसींना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here