एसटी संप : परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली ही मोठी घोषणा, म्हणाले….

640

The गडविश्व
मुंबई : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करता येणार नाही अशी शिफारस त्रिसदस्यीय समितीन केली आहे. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
अहवाल आल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले आहे. २८ हजार कर्मचारी विनंतीला प्रतिसाद देत कामावर आले आहेत, अजूनही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावार आलेले नाहीत.
आता समितीचा अहवाल आलेला आहे, पुन्हा एकदा या कर्मचाऱ्यांना आव्हान करतो आपण कामावर यावे, ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही, अशा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावार यावे, जे कर्मचारी निलंबित झालेले आहेत, त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल त्यांनीही कामावर यावे , ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस देण्यास आली आहेत ती नोटीसही मागे घेतली जाईल त्यांनीही कामावर यावे, जे कर्मचारी बडतर्फ झालेले आहेत, त्यांनी कायदेशीर प्रक्रियेने अपील करावे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत, कागगारांची रोजीरोटी जाता कामा नये याची काळजी घ्या नोकरीपासून वंचित ठेवू नका असंही अनिल परब यांनी म्हटले आहे.
यानंतरही कामगार कामावर आले नाहीत तर या कामगारांना नोकरीची गरज नाही असे आम्ही समजू. यानंतर आम्ही दुसऱ्या पर्यायांचा विचार करु, याची जबाबदारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची असेल. कुणाच्या अफवांना किंवा कुणाच्या भूलथापांना बळी न पडता कामावर या असे आवाहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here