एसटी महामंडळाच्या नोकर भरतीला फूलस्टॉप : २ हजार २०० उमेदवार वेटिंगवरच

327
FILE PHOTO

– एसटी महामंडळाने जाहीर केला निर्णय
The गडविश्व
मुंबई : एसटी नफ्यात येत नाही तोवर नोकर भरतीला फूलस्टॉप असणार आहे. तसेच एसटीची नोकर भरती बंद करण्यात आल्याचा निर्णय एसटी महामंडळाने जाहीर केला आहे. तसेच प्रतिक्षा यादीतल्या उमेदवारांनाही संधी मिळणार नाही. महामंडळ आधीच तोट्यात आहे. त्यातच संपकाळात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे खर्च नियोजनात नव्या भरतीवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी विलीनीकरणासंदर्भात नुकत्याच सादर झालेल्या तीन सदस्य समिती अहवालातही महामंडळात नवीन भरतीवर निर्बंध आणण्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे प्रतीक्षा यादीवरील २ हजार २०० कर्मचाऱ्यांचेही दरवाजे बंद झाले आहेत. एसटीच्या काही कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. एसटी विलीनीकरणावरून गेल्या कित्येक दिवसापासून एसटी कर्मचारी संपावर आहे. अजूनही एसटी कर्मचारी कामावर परतण्यास तयार नाहीत. यामुळे सामान्य प्रवाशांचा हाल होत आहे. एसटी पूर्ववत करण्यासाठी एसटी महामंडळ सेवानिवृत्त चालक करारपध्दतीने भरती करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here