एमआयडीत कंपनीतील गोडावूनला आग

426

– एका कामगाराला वायुची बाधा
The गडविश्व
रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रिवी ऑर्गेनिक कंपनीत आज पहाटेच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीत कंपनीचे गोडावून जळून खाक झाले आहे. कंपनीला लागणारा कच्चा माल या गोडावूनमध्ये ठेवण्यात आला होता अशी माहिती आहे.
कंपनीच्या कामासाठी लागणारे विविध प्रकारच्या सॉल्वंटची या गोडावूनमध्ये साठवणूक करण्यात आली आहे. सॉल्वंट ज्वनशील असल्याने, ही आग झपाट्याने वाढली. एमआयडीसीच्या दोन अग्निशमन बंबांसह चिपळूण आणि खेड नगरपालिकेचे अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र आगीने रौद्ररुप धारण केले असल्याने ती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु होते. आग लागली त्या दरम्यान गोडावूनमध्ये कोणीही नव्हते. दरम्यान, एका कामगाराला वायूची बाधा झाली आहे. या कंपनीचा मुख्य प्रकल्प आणि अशोका गॅस कंपनी, या गोडावूनच्या बाजुला आहे. आग आटोक्यात आणण्यायाठी कंपनीचे कामगार, ग्रामस्थ, अग्निशमन यंत्रणांचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here