एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

490

The गडविश्व
मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची एकनाथ शिंदें यांनी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची नुकतीच शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे २० वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. या शपथविधीच्या कार्यक्रमाला भाजपचे काही नेते, पत्रकार उपस्थित होते.“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वरसाक्षी शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालं आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा राखीन. मी भारताची सार्वभौमत्व आणि एकात्मता राखीन. मी महाराष्ट्राच्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि शुद्ध बुद्धीने पार पाडेन. संविधान आणि कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे, तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकष न बाळगता न्यायाची वागणूक देईन”, अशी शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होण्यास इच्छूक नव्हते. पण भाजपच्या वरिष्ठांनी आग्रह केल्याने त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here