उन्हाळी बॉक्सिंग क्रीडा प्रशिक्षणात खेळाडूंचा उत्कृष्ठ प्रतिसाद

266

The गडविश्व
गडचिरोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे व गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्हात उन्हाळी प्रशिक्षण शिबीर 20 मे ते 3 जुन पर्यंत घेण्यात येत असून गडचिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांच्या हस्ते नुकतेच या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन होत जिल्हात विविध खेळात उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी क्रीडा संकुलातील प्रशिक्षण केंद्रांना भेट देऊन संबंधित क्रीडा प्रकाराच्या क्रीडा मार्गदर्शकांना शिबिराबाबत महत्वाच्या सूचना दिल्या. त्यात उन्हाळी बॉक्सिंग प्रशिक्षणात 70 ते 80 खेळाडूंचा उत्कृष्ठ प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सदर प्रशिक्षण क्रीडा प्रबोधनी गडचिरोली येथे सकाळी 6 ते 8 तर सायं. 5 ते 7 वाजता पर्यंत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यात प्रशिक्षक म्हणून पंकज मडावी, महेश निलेकार, संतोष गैनवार, निखिल इंगळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे तसेच उपस्थित खेळाडूंना जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव यशवंत कुरुडकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामुळे गडचिरोली शहरातील क्रीडा संस्कृतीला अधिकाधिक चालना मिळेल व भविष्यातील विजेते पुढे येतील.

महेश निलेकार ( बॉक्सिंग प्रशिक्षक)

शालेय विद्यार्थी खेळाडूंचा शारीरिक व मानसिक विकास व खेळातील मूलभूत कारक कौशल्याचा सराव खेळाडूकडून करून घेत आहोत. त्यामुळे भविष्यातील गुणवंत क्रीडापटू या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरातून पुढे येतील.

पंकज मडावी ( शिबीर प्रशिक्षक )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here