उद्या १७ जून ला दहावीचा निकाल ; असा पहा निकाल

4747

– असा पहा निकाल
The गडविश्व
मुंबई :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन  जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिकृत ट्विटर द्वारे माहिती दिली आहे.
या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे.
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती https://t.co/g7ZbJdsffV या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिकृत संकेतस्थळ :

http://www.mahresult.nic.in/

http://sscresult.mkcl.org/

https://ssc.mahresults.org.in/

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here