उद्या शिवसेनेच्या वतीने गडचिरोली शहरात आरोग्य शिबिराचे आयोजन

260

– जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
THE गडविश्व
प्रतिनिधी / गडचिरोली : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली शहरवासीयांसाठी उद्या २ जानेवारी २०२२ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये आरोग्य तपासणी, औषेधे, चष्मे वाटप, हृदयरोग तपासणी,रक्तदाब, शुगर, ईसीजी व इतर तपासण्या तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया आवश्यक असल्यास मोफत शास्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
सदर आरोग्य शिबीर जुनी प्लॅटिनम जुबली हायस्कुल चामोर्शी रोड गडचिरोली येथे सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत नियोजित वेळेत करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख रामकीरीत यादव, माजी नगराध्यक्षा डॉ.अश्विनी यादव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here