उद्या विसापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

296

– शिवसेनेचे शहर प्रमुख रामकिरीत यादव व माजी नगराध्यक्षा डॉ. अश्विनी यादव यांच्या हस्ते उदघाटन
The गडविश्व
गडचिरोली : शहरानजीकच्या विसापूर येथे शिवराय युवा मंडळ व गावकऱ्यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे भव्य अनावरण व लोकार्पण सोहळा उद्या १ व २ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन शिवसेनेचे शहर प्रमुख रामकिरीत यादव व दीपप्रज्वलन माजी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी यादव यांच्याहस्ते पार पडणार आहे. तर या अनावरण सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी राहणार असून माजी जि. प अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी जि.प उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू कावळे, शिवसेनेचे विधानसभा संघटक नंदू कुमरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी नगरसेवक केशव निंबोड, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, माजी नगरसेवक सतीश विधाते, संजय मेश्राम, विठ्ठल नवघरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त १ मे रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजतापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी २ मे रोजी सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाला परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवराय युवा मंडळ व विसापूरवासियांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here