उद्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट व (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परिक्षा, परिक्षा केंद्रांच्या ठीकाणी 144 कलम लागू

166

The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट व (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परिक्षा -2021 परीक्षा शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील विविध 14 परिक्षा उपकेंद्रावर सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत घेण्यात येणार असल्याने सदर परिक्षा शांततेत पाडणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी अधिकाराचा वापर करुन दिनांक 26 फेब्रुवारी 2022 सकाळी 8.00 वाजेपासुन दुपारी 2.00 वाजेपर्यंत परिक्षेच्या दिवशी संबंधित परिक्षा केंद्राच्या ठीकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता,1973 चे कलम 144 नुसार कलम 144 लागु केली आहे.
परिक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर,पानपट्टी,टायपिंग सेंटर,एस टी डी बुथ,ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमानां परिक्षा सुरु होण्यापुर्वी दोन तास व परीक्षा सुरु असण्याचा संपुर्ण कालावधीत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.परिक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन,सेल्यूलर फोन,फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल.परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस/वाहनास प्रवेशास मनाई राहील.तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती परीक्षार्थी व परिक्षेसी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून एकत्रितरित्या प्रवेश करण्यास मनाई आहे. कोणत्याही व्यक्तीकडून परिक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतेही बाधा उत्पन्न करु नये.तसेच परिक्षा केंद्राचे परिसरात परिक्षेच्या कालावधित ध्वनीप्रदुषणामुळे परिक्षार्थिंना त्रास होईल असे कृत्य करु नये.कोवीड-19 चे अनुषंगाने,शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या हे आदेश परिक्षा केद्रावर काम करणारे अधिकारी,कर्मचारी,परीक्षार्थी,निगराणी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे बाबत त्याचे परिक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागु राहणार नाही असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here