उद्या काँग्रेसच्या वतीने वाढती महागाई, बेरोजगारी विरोधात जेलभरो आंदोलन

220

– आंदोलनात सहभागी होण्याचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे आवाहन

The गडविश्व
गडचिरोली,४ ऑगस्ट : देशभरात वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्वक वस्तुंवर लादण्यात आलेल्या जीएसटी यामुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या वतीने उदया ५ ऑगस्ट रोजी देशभरात तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात राज्यात केंद्रसरकार व राज्य सरकार विरोधात जेलभरो आदोलन करण्यात येणार असून गडचिरोली जिल्हा कॉंग्रेसच्या वतीनेही गडचिरोली शहरात जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे गडचिरोली जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आज जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते बोलत होते.
देशभरात वाढत्या महागाईने जनसामान्यांचे कंबरडे मोडलेले आहे. तसेच वाढती बेरोगारी, व जीवनावश्यक वस्तुंवर लावलेल्या जीएसटीमुळे खिशाला आणखी कात्री लागत आहे. असे असतांना नागरिकांचे जीवन जगने कठीण झाले असून याविरोधात कॉंग्रेसच्या वतीने जेलभरो आंदोलन उदया दुपारी १२ वाजता करण्यात येत आहे. या आादोलनात जिल्हयातील सर्वच कार्यकर्ते उपस्थित राहणार असून तालुका स्तरावर सुध्दा याबाब निवेदने देण्यात येणार आहे असे जिल्हाध्यक्ष ब्राम्हणवाडे बोलत होते.
पुढे बोलतांना ब्राम्हणवाडे म्हणाले की, केंद्र सरकार विरोधात कोणीही आवाज उठवला तर ईडीची धाक व कारवाई केल्या जात आहे, राज्यात असलेली सरकार ही ‘हम दो हमारी दो’ अशी सरकार आहे अशी टीका सुध्दा यावेळी त्यांनी केली. तसेच कॉंग्रेसच्या वतीने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी माडल्या परंतु अदयाप कोणतीही घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली नाही, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी ७५ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली असून जनसामान्याचा आवाज बुलंद करण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशिल आहे. उद्या होणाऱ्या जेलभरो आंदोलनात जास्तीत जास्त कार्यकर्ते तसेच नागरिकांनी सहभागी होवून हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला महाराष्ट्र कॉंग्रेस सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस डॉ.चंदाताई कोडवते, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव भावनाताई वानखेडे, माजी न.प. उपाध्यक्ष रमेश चौधरी, आरमोरीचे नगरसेवक मिलींद खोब्रागडे, सगुनाताई तलांडी, अनुसूचीत जाती अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रोजगा स्वयंरोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, संजय चन्ने, नेताजी गावतुरे, राकेश रत्नावर, शालिक पत्रे, विजय सुपारे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here