– खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन
The गडविश्व
वरोरा : तालुक्यातील शेगाव (बु) येथे नव्याने स्थापन होणाऱ्या लोकसमृध्दी बचत निधी लिमिटेडचा भव्य उद्घाटन सोहळा उद्या १ मार्च २०२२ रोजी दुपारी १२ वाजता आयोजीत करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळयाला उद्घाटक म्हणून खासदार बाळुभाऊ धानोरकर, सहउद्घाटिका आमदार सौ.प्रतिभाताई धानोरकर, तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लोकसंमृध्द बचत निधी लिमिटेडचे संचालक रविंद्रजी काळमेंघेे, प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चंद्रपूरचे बांधकाम व वित्त सभापती राजुभाऊ गायकवाड, चं.जि.म.बॅंकेचे माजी अध्यक्ष रविंद्रजी शिंदे, शेगाव (बु) चे सरपंच सिध्दार्थ पाटील, कृषी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष केशव बुऱ्हाण यांची उपस्थिती असणार आहे.
या उद्घाटन सोहळयाला अधिकाअधिक नागरिकांनी उपस्थित राहवे असे आवाहन लोकसमृध्दी बचन निधी लिमिटेड शेगाव (बु) चे संचालक मंडाळांनी केले आहे.