उत्तर प्रदेश निवडणूक : काँग्रेसकडून 40 टक्के महिलांना उमेदवारी, 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

350

– उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईलाही उमेदवारी

The गडविश्व
लखनऊ : देशभरातील पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही तिकीट देण्यात आल्याची माहिती, उत्तरप्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याच दरम्यान, प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. “उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आहोत. या यादीत एकूण 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असे प्रियंका गांधी यांनी म्हंटले. सर्वात महत्वाचे म्हणजे संबंधित यादीत उन्नाव बलात्कार पीडित तरुणीच्या आईलाही उमेदवारी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here