– मृतदेह ५० मीटर अंतरावर पोत्यात भरून दिला टाकून
The गडविश्व
वर्धा : येथे पत्नीने दोघांच्या मदतीने पतीची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह पोत्यात भरून घराच्या अवघ्या ५० मीटर अंतरावर टाकून दिल्याची घटना काल शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेतील ३ आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर घटनेमुळ आष्टी शहर पूर्णतः हादरून गेले आहे. जगदीश भानुदास देशमुख (३८) असे मृतकाचे नाव आहे तर पत्नी दीपाली देशमुख (३२), प्रियकर शुभम जाधव (२२), साथीदार विजय माने (२१) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक हा गवंडी कामगार होता. दीपालीसोबत त्याचे काही वर्षागोदर विवाह झाले होते. त्यांना पाच वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे. दोघांचा सुखी संसार सुरळीत सुरू होता. परंतु जगदीशला दारूचे व्यसन लागले होते त्यामुळे पती पत्नीत नेहमी लहान मोठे वाद होत असायचे. पत्नी दीपाली हि पतीपासून त्रस्त होती यावेळी तिचे सूत शुभम जाधव याच्याशी जुळले. याबाबत पती जगदीशला माहित झाल्याने त्याने पत्नी दीपालीशी वाद केला. अखेर पत्नी दिपालीने पती जगदीश चा काटा काढण्याचे ठरविले व गुरुवारी मध्यरात्री प्रियकर शुभम आणि त्याचा मित्र विजय यांनी मिळून जगदीशच्या डोक्यावर सेंट्रिंगच्या पाटीने जबर वार करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धारदार शस्त्राने वार करीत जगदीशची हत्या केली व मृतदेह रात्रोच्या सुमारास पोत्यात भरून नवीन आष्टी शहराच्या बाहेर फेकून विल्हेवाट लावण्याचा बेत आरोपींनी आखला होता. मात्र यादरम्यान तिघेही अज्ञात व्यक्तीच्या निदर्शनास आल्याने पोत्यात भरलेला मृतदेह आरोपींनी शिक्षक दिनेश टेकाडे यांच्या घराजवळ असलेल्या गल्लीत फेकून दिल्याची माहिती आहे.
सदर घटनेबाबत पहाटेच्या सुमारास फिरायला निघालेले शिक्षक दिनेश टेकाडे यांना रस्त्याच्या कडेला पोत्यात काहीतरी असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी माहिती गृहरक्षक उमेश धानोरकर यांना दिली. उमेशने पोत्याची पाहणी केली असता मृतदेह दिसून आला. त्याने याची माहिती ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांना दिली.
घटनची माहिती मिळताच श्वानपथक, ठसे तज्ज्ञांसह स्थानिक गुन्हे शाखेची चमू दाखल झाली होती. यावेळी अधिक तपास करून आरोपी पत्नीसह तिघांना अटक करण्यात आली. अधिक तपास आष्टी पोलीस करीत आहे.