आशिया कप २०२२ : आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने

846

– दुबईच्या मैदानात रंगणार सामना
The गडविश्व
नवी दिल्ली, २८ ऑगस्ट : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला भारत आणि पाकिस्तान सामना आज रंगणार आहे. आशिया कप २०२२ स्पर्धेला काल २७ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली असून अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला मात दिली. आता भारत आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK 2022) खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.
आज २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील पहिला सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सामना सामना सुरु होणार असून दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवला जाणार आहे.
हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार (Hotstar) अँपवरही सामना पाहता येईल.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.

पाकिस्तान संघ :

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here