आविसच्या पदाधिकाऱ्यांनी राकाँत प्रवेश केलाच नाही

194

-दामरंचा येथील आविसचे पदाधिकारी व ग्रापं सदस्य साम्मा कुरसाम यांची स्पष्टोक्ती
The गडविश्व
अहेरी, ३ सप्टेंबर : आपल्या परिसरातील समस्या आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दुपट्टा टाकून पक्षात प्रवेश केल्याचे दाखविले. मात्र, आपण कोणत्याच पक्षात प्रवेश न केल्याची स्पष्टोक्ती दामरंचा येथील आविसचे पदाधिकारी व ग्रापं सदस्य साम्मा पडगा कुरसाम यांनी दिली आहे.
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत दामरंचा येथील ग्रामपंचायत सदस्य साम्मा पडगा कुरसाम यांच्यासह आविस चे कार्यकर्ते ईरीया ईरपा कुळमेथे, मासा पेंटा सिडाम, वसंत गणपत कुरसाम इत्यादींनी आदिवासी विद्यार्थी संघाला सोडून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर विश्वास ठेवून आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे दाखवण्यात आले असून तसे वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. मात्र, दामरंचा ग्रापंचे सदस्य सम्मा कुरसाम यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट घेऊन आपल्या क्षेत्राचे आमदार म्हणून त्यांच्याकडे समस्या घेवुन गेलो होतो, मात्र त्यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना दुपट्टा टाकून प्रवेश केल्याचे दाखवले. सदर प्रकार हा चुकीचा असून मी आदिवासी विद्यार्थी संघामध्येच असल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. आज कंकडालवार यांच्या निवासस्थानी घडलेली आपबीती कुरसाम यांनी सांगितली. यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, दामरंचाचे माजी सरपंच जिलकरशाह मडावी, इंदारामचे माजी सरपंच गुलाबराव सोयाम, आविसचे कार्यकर्ते प्रमोद कोडापे, विनोद दूनालावार, पोदा वेलादी, दशरू सिडाम, आलापलीचे माजी ग्राम पंचायत सदस्य सलीम शेख, नरेंद्र गरगाम, राकेश सड़मेक इत्यादी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here