आर्वी गर्भपात प्रकरण : अखेर डॉ. कदम यांना अटक

174

– घरात आढळली काळविटाची कातडी

The गडविश्व
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गर्भपात प्रकरणात ) कदम हॉस्पिटलचे डॉ. कदम (Dr. Kadam) यांना अखेर अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. डॉ. कदम यांना अद्याप अटक करण्यात आलं नव्हतं. मात्र आता पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला असून डॉ. कदम यांना अटक केलं आहे. आर्वी गर्भपात प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता सहावर पोहोचली आहे. 15 जानेवारी रोजी रात्री उशिरा डॉ. कदम यांना तब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गर्भपात प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहेत. आर्वी येथील कदम हॉस्पिटलमध्ये बुधवारी म्हणजेच 12 जानेवारी रोजी बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचे समोर आले होते.
आर्वी शहरात असलेल्या कदम रुग्णालयात गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी सेंटर आहे. गर्भपात केंद्र हे डॉ.रेखा कदम यांच्या सासू डॉ. शैलेजा कदम यांच्या नावावर आहे. तर सोनोग्राफी सेंटर हे डॉ. रेखा कदम आणि डॉ.नीरज कदम या दोघांच्या नावाने आहे. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला होता. हा प्रकार उघडीस आल्यानंतर मुलीच्या आई व वडिलांसह गर्भपात करणाऱ्या डॉ. रेखा कदम आणि 2 परिचारिका अशा एकूण 5 जणांना पोलिसांनी अटक केलं होतं. आता याच प्रकरणात मध्यरात्री डॉ. नीरज कदम यांना पोलिसांनी अटक केलं आहे. या अटकेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
याच कदम रुग्णालयाच्या गर्भपात केंद्राचा परवाना हा डॉ. शैलेजा कदम यांच्या नावे असल्याने त्यांनाही चौकशीसाठी सूचनापत्र पोलिसांनी बुधवारी दिले होते. मात्र, या दरम्यान शैलेजा कदम यांची प्रकृती खालावली. शुक्रवारी त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णायलात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती आहे. शनिवारी सकाळपासूनच कदम रुग्णालय परिसरात डॉ. नीरज कदम यांना सोबत घेत आर्वी पोलिसांसह आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली. याच दरम्यान पोलिसांना कदम यांच्या घरात काळविटीची कातडी आढळली. तर आरोग्य विभागाच्या पथकला काही औषधी आणि इंजेक्शनसुद्धा मिळाले असून ते आरोग्य विभागाने जप्त केले आहे. दिवसभर चाललेल्या तपासणीनंतर आर्वी पोलिसांनी डॉ. नीरज कदम यांना मध्यरात्री बेड्या ठोकल्या. त्यामुळे आता याप्रकरणात आरोपी संख्या सहावर पोहचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here