– स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
The गडविश्व
आरमोरी : स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने आरमोरी येथे आज मंगळवार १५ मार्च २०२२ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण २७ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे आयोजन स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्ह्याचे अध्यक्ष चारुदत्त राऊत, उपाध्यक्ष निशिकांत नैताम यांनी केले. यामध्ये आरमोरी शहरातील व बाजूच्या परिसरातील एकूण २७ युवकांनी सहभाग घेतला.
सदर शिबिरात शेषराज सोनकुसरे, सुरज हजारे, हर्षल रामटेके, संदेश गाढवे, रोशन काळबांधे, प्रवीण काळबांधे, अंकुश गेडाम, शुभम इंकने, धनंजय रामटेके, वैभव धनकर, आशिष, पुणेकर, सचिन आखाडे, योगेश उरकुडे, रोहित खेवले, मनोज गेडाम, स्वप्निल सोरते, अरविंद सेलोटे, श्रीराम ठाकरे, यश काळबांधे, प्रफुल्ल मेश्राम, जितेंद्र तलमले, कुणाल ठाकरे, दिपक खापरे, अजय कुथे, अक्षय बडगे, आदेश वटे, आकाश मस्के इत्यादी रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराला शहरातील नागरिकांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहकार्य लाभला त्याप्रसंगी चंदाताई राऊत, चंदाताई खापरे, युवारंग चे अध्यक्ष राहुल जुआरे, युवारंग चे कोषाध्यक्ष प्रफुलजी खापरे, युवारंग चे संघटक नेपचंद्र पेलणे, सुरज पडोले, प्रफुल्ल मोगरे, रोहित बावनकर, सचिन लांजेवार, राहुल हर्षे, युवारंग चे सदस्य, राकेश सोनकुसरे, सिकंदर नंदरधने, किरणापूरे, जुआरे, वैद्यकीय अधिकारी उईके मॅडम, गौरी साळवे, आशिष वासनिक, श्रीमती पारधी, श्रीमती निकेसार, डॉ. मेश्राम, डॉ. मारभते, नरेश कुन्दिकुरवार, निलेश सोनवणे, कु. खुशबू कुळसंगे, जिवन गेडाम, बंडू कुंभारे जिल्हा रक्तपेढी गडचिरोली कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
