आरमोरी : बिबट्याच्या हल्ल्यात इसम जखमी

251

– तालुक्यात वन्यप्राण्याचे मानवावरील हल्ले वाढले
The गडविश्व
आरमोरी ३ जुलै : शहरापासून ४ किमी अंतरावर असलेल्या रामाळा येथे पहाटे फिरायला गेलेल्या इसमावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना शनीवार २ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली. प्रकाश देवाजी मानकर (४२) रा. बाजारपेठ वार्ड, आरमोरी असे जखमी इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रकाश आपल्या साथीदारांसह पहाटेच्या सुमारास रामाळा येथे फिरायला गेला होता. दरम्यान प्रकाश मानकर शौचास बसले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी प्रकाश यांनी आरडाओरड केली असता सोबत असलेले दोन साथीदार धावून आले व बिबट्याने पळ काढला. बिबट्याने प्रकाश यांच्या गालाजवळ व कानाजवळ पंजाने वार केल्याने जखमी झाले आहे. आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
दरम्यान आरमोरी तालुक्यात वन्यप्राण्यांचे मानवावरील हल्ले वाढले आहे. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here