आरमोरी : पालोरा शेतशिवारात आढळल्या वाघाच्या जीवंत पाऊलखुणा, नागरिक पुन्हा दहशतीत

1733

– जेरबंद केलेला सिटी १ वाघ हाच १३ जणांना ठार केलेला वाघ कशावरून ?
The गडविश्व
ता.प्र / नरेश ढोरे (आरमोरी) १४ ऑक्टोबर : देसाईगंज तालुक्यातील एकलपुर जंगल परिसरात सिटी १ नावाचा वाघ जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले मात्र आरमोरी तालुक्यातील शेतशिवारात वाघाच्या पाऊलखुणा दिसल्याने नागरिकात दहशत पसरली असून जेरबंद करण्यात आलेला वाघ हाच १३ जणांचा बळी घेणारा कशावरून ? असा प्रश्न आरमोरी तालुक्यातील नागिरकांना पडला आहे.
काल १३ ऑक्टोबर रोजी देसाईगंज तालुक्यातील एकलपुर जंगल परिसरात सिटी १ वाघाला जेरबंद करण्यात आले. या वाघाने १३ नागरिकांचा बळी घेतला असे बोलल्या जात आहे मात्र काल १३ ऑक्टोबर रोजी आरमोरी तालुक्यातील पालोरा शेतशिवारात वाघ फिरत असल्याचे दिसून आले. पालोरा येथील शेतकऱ्यांनी आज सकाळी आरमोरी जोगीसाखरा रोड वरुन एका शेतकऱ्याच्या शेतात जाणाऱ्या पांदन रस्त्यावर जीवंत पाऊलखुणा आढळुन आल्याने या परीसरात अजूनही वाघ वावरत आहे हे स्पष्ट होत आहे व सालमारा येथील बळीराम कोलते व रामाळा येथील आनंदराव दुधबळे यांचा बळी घेणारा हा सिटि १ नसुन तो अन्य दूसरा वाघ आहे असे परिसरातील नागरीकाकांचे म्हणणे आहे. जीवंत पाऊलखुणा आढळुन आल्याने नागरिकांमध्ये भीती कायम आहे तरी वनविभागाने एकदम मोकळे न सोडता वैरागड- आरमोरी या परीसरात अजूनही वाघ असून पुन्हा काही विपरीत घटणा घडण्यापुर्वी पाळत ठेवून त्यावर उपाय करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here