The गडविश्व
ता. प्र / आरमोरी, २ ऑक्टोंबर : स्थानिक डॉ. आंबेडकर विद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. महात्मा गांधी जयंती निमित्त वक्तृत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभाग घेवून महात्मा गांधीं यांच्या विषयी भाषणे दिली.
शाळेचे मुख्याध्यापक विनोद शेंडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक नैताम, पानसे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक शेंडे यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महात्मा गांधी यांचे योगदान मनोगतातून व्यक्त केले. स्वतंत्र भारताच्या विकासासाठी लहान मुलांची, तरुण पिढीची जबाबदारी हा विचार त्यांनी मनोगतातून व्यक्त केला. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्याना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
शाळेचे शिक्षक सोमनकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनमाळी यांनी केले.