आरमोरी : आज पुन्हा वाघाच्या हल्ल्यात इसमाचा बळी

3137

– वाघ आणखी कीती बळी घेणार ?
The गडविश्व
ता. प्र / नरेश ढोरे (आरमोरी ), ८ ऑक्टोबर : तालुक्यातील देशपुर कुरंझा जंगल परिसरात वाघाने हल्ला करून इसमास ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आज शनिवार ८ ऑक्टोबर रोजी पुन्हा आरमोरी शहरानजीकच्या रामाळा रामाळा प्र.क्र.३ शेतशिवारात वाघाने हल्ला करून इसमाच्या नरडीचा घोट घेत ठार केल्याची खळबळजनक घटना दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आनंदराव दुधबळे रा. रामाळा प्र.क्र.३ .ता. आरमोरी जि. गडचिरोली असे मृतक इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, रामाळा येथील रहीवासी आनंदराव दुधबळे हे जंगलालगत असलेल्या स्वतःच्या शेतात गेले असता दबा धरुन बसलेला वाघाने त्यांच्यावर झडप घेऊन नरडीचा घोट घेतला व फरफटत जंगलात घेऊन गेला यात त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाच्या कर्मचाऱ्याने घटनास्थळ गाठून मोका चौकशी केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हारुग्णालय आरमोरी येथे पाठविण्यात आले आहे.
सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून. वारंवार वाघाचा प्राप्त बंदोबस्त करावा अशी मागणी करूनही वाघ हुलकावणी देत वनविभागाच्या पथकाला अपयश प्राप्त होत आहे. त्यामुळे पुन्हा किती नागरिकांचा बळी वाघ घेणार ? असा रास्त प्रश्न नागरिक विचारीत आहे.

©©©©©

[Tiger attack Armori Gadchiroli news ]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here