आयपीएलच्या १५ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर

688

The गडविश्व
मुंबई : आयपीएलच्या बहुप्रतिक्षित १५ व्या मोसमाचे आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ व्या मोसमाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. तर २९ मे ला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती ट्विट करुन देण्यात आली आहे.
या मोसमात एकूण ७० साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत. या साखळी फेरीतील सामन्यांचे आयोजन महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबईसह पुणे शहरात करण्यात आलेलं आहे. तर प्लेऑफ सामन्याचे ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विटद्वारे दिली आहे.
या मोसमात लखनऊ आणि अहमदाबाद दोन संघ नव्याने जोडले गेले आहेत. त्यामुळे एकूण संघाची संख्या ही १० झाली आहे. त्यानुसार या १० संघांची विभागणी आयपीएल २०११ नुसार दोन ग्रृपमध्ये करण्यात आली आहे. या एकूण १० संघांची विभागणी प्रत्येकी ५ यानुसार १२ गटात करण्यात आली आहे.

ग्रृप ए मध्ये

मुंबई इंडियन्स
कोलकाता नाईट रायडर्स
राजस्थान रॉयल्स
दिल्ली कॅपिट्ल्स
लखनऊ सुपर जायंट्स

ग्रृप बी मध्ये

चेन्नई सुपर किंग्स
सनरायजर्स हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
पंजाब किंग्स
गुजरात टायटन्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here