– जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांची माहिती
The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीकरिता आरक्षण जाहीर करण्यात आले असून या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण २७ जागा लढविल्या जाणार आहे अशी माहिती जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांनी दिली आहे.
रविवार १९ जून रोजी आम आदमी पार्टी जिल्हा कार्यालयात आगामी नगर परिषद निवडणुकी संदर्भात बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात तसेच प्रभाग रचनेनुसार उमेदवार निवडी बाबत चर्चा करण्यात आली. नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीकरिता आरक्षण जाहीर होताच विविध राजकीय पक्षांतर्फे मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. आम आदमी पार्टी सुद्धा गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणूक रिंगनात उतरणार असून संपूर्ण २७ जागा लढवणार आहे. दिल्ली आणि पंजाब राज्यात आम आदमी पार्टीची सत्ता असून पंजाब मध्ये नुकतीच सत्ता स्थापन होताच मुख्यमंत्र्यांच्या वतीने अनेक विकासात्मक निर्णय घेण्यात आले. या निर्णयाचे सकारात्मक बदल सुद्धा दिसून येत असून गडचिरोली आम आदमी पार्टी च्या वतीने आगामी नगर परिषद निवडणूक लढवून सत्ता स्थापन करून शहराला विकासाच्या दिशेने नेण्याचा मानस आहे.
या बैठकीत मिनाक्षी खरवडे, संतोष कोटकर यांचा पक्ष प्रवेश ही घेण्यात आला.
यावेळी आपचे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, कोषाध्यक्ष संजय जिवतोडे, शहर संयोजक कैलास शर्मा, शहर संघटन मंत्री हितेंद्र गेडाम, महिला वींगच्या अलका गजबे, शहर अध्यक्षा समीता गेडाम, मिनाक्षी खरवडे, सोनल नन्नावरे, विकास पेंदाम, गणेश त्रिमुखे, संतोष कोटकर, चेतन येनगंटीवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.