आदिवासी समाजाने आपले अधिकार, कर्तव्य सामाजिक बांधिलकी ठेवून शैक्षणिक दर्जा वाढवावा : खा.अशोक नेते

259

– समुद्रपुर येथे विश्व आदिवासी अधिकार दिनानिमित्त भव्य आदिवासी सन्मान प्रबोधन मेळावा व पक्ष प्रवेश संपन्न
The गडविश्व
समुद्रपुर, १९ सप्टेंबर : विश्व आदिवासी अधिकार दिनानिमित्त भव्य आदिवासी सन्मान प्रबोधन मेळावा व पक्ष प्रवेश दिपाली मंगल कार्यालय,समुद्रपुर येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खा.अशोक नेते यांनी बोलतांना देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव पर्वाच्या निमित्ताने भारत देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदी देशातील आदिवासी समाजातील पहीली महिला महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांची निवड म्हणजे आदिवासी समाजाला गौरवास्पद भुषण बाब आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक समाज घटकाला न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपुर्ण काम केले व १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी सुरुवात होत आहे असे प्रतिपादन याप्रसंगी खा.अशोक नेते यांनी केले.
तसेच भव्य आदिवासी सन्मान मेळावा याप्रसंगी बोलतांना आदिवासी समाजातील अधिकार कर्तव्य, सामाजिक बांधिलकी ठेवून, शैक्षणिक दर्जा वाढवावा,गरीब, अनुसूचित जमाती, दलित आणि मागासवर्गीयांचे सरकार आहे. काँग्रेस सरकारच्या काळात (आदिवासी) लोकांच्या कल्याणासाठी केवळ २१,००० कोटी रुपये देण्यात आले होते, परंतु २०१४ मध्ये प्रधानमंत्री मोदी सत्तेवर आल्यानंतर आदिवासी उत्थानासाठी निधी ७८,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला.
आदिवासी भागात ५० एकलव्य निवासी मॉडेल शाळा उभारल्या जात आहेत. प्रत्येक गावात मोफत रेशन दिले जात आहे. पूर्वी केवळ ८-१०पिकांना मान्यता होती, तेथे ९० वनोपजांना मान्यता देऊन सरकारी मदत दिली जात आहे. आदिवासी भागात सुमारे दीडशे वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सुमारे २५०० वन धन विकास केंद्रे आणि ३७,००० स्वयं-सहायता गट तयार करण्यात आले आहेत. २० लाख जमिनीचे पट्टे दिले आहेत.
या कार्यक्रमाप्रसंगी खा.अशोक नेते, समिरजी कुणावार आमदार हिंगणघाट, समुद्रपुर विधानसभा क्षेत्र, सुनिलजी गफाट जिल्हाध्यक्ष वर्धा, मुक्कामसिंह किराडे माजी आमदार (मध्यप्रदेश) तथा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य, संजयजी पुराम आमदार देवरी, आमगांव विधानसभा क्षेत्र, नितीनजी मडावी मा.जी.प.अध्यक्ष वर्धा, चेतनजी पेंदाम महा.प्रदेश सचिव, भारतजी कोवे जिल्हाध्यक्ष आदि.आघाडी वर्धा, सौ.वैशाली कुरके माजी.पं.स.सदस्य तसेच मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here