आदिवासी विद्यार्थी संघातर्फे आगग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत

257

– माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार आगग्रस्त कुटुंबाची घेतली भेट

The गडविश्व
सिरोंचा : येथून जवळच असलेल्या मेडाराम येथील शेतकरी गट्टू काटरेवला यांच्या घराला अचानक आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. या आगीमध्ये घरातील जीवनावश्यक वस्तू रक्कम, धान्य व एक मोटारसायकल जळाले. या घटनेने काटरेवाला कुटुंब दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे काल नारायणपूर येथे क्रिकेट सामान्याच्या उदघाटनासाठी गेले असता आदिवासी विद्यार्थी संघाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी मेडाराम येथील घटनेची माहिती देताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी लगेच आपल्या कार्यकर्त्यांसह मेडाराम येथे पोहचून आगग्रस्त कुटुंबाची आस्थेने विचारपूस करून त्यांना आर्थिक मदत करून शासनाकडून लवकरत – लवकर घरकुल व इतर मदत मिळवून देण्याची सांगितले आहे.
यावेळी आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, वेंकन्ना ताल्ला, सरपंच सुरज गावडे, आविसं शहर अध्यक्ष रवी सुलतान, उपसरपंच अशोक हरी, नागराजू इंगली, अशोक इंगली, तंटामुक्त अध्यक्ष गट्टू चम्माकारी, आविसं सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला, आविसं कार्यकर्ते गणेश रच्चावार, इमरान खानसह आविसंचे पदाधिकारी वा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here