आदिवासी विद्यार्थी संघाकडून अहेरी नगर पंचायतमध्ये नगराध्यक्ष पदाकरिता नामांकन दाखल

103

– माजी आमदार दिपक आत्राम व जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार,पं .स.सभापती भास्कर तलांडे, जि.प.सदस्य अजय नैताम यांची उपस्थिती
The गडविश्व
अहेरी : स्थानिक नगर पंचायत नगराध्यक्ष पदाची निवड येत्या 14 फ्रेबुवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे. करीता आज आदिवासी विद्यार्थी संघातर्फे नगराध्यक्ष पदाकरिता रोजा शंकर करपेत ह्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत आज नगर पंचायत कार्यालयात अहेरी येथील निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामानिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जि.प.सदस्य अजय नैताम व नव निर्वाचित नगर सेवक रोजा शंकर करपेत, मिना माणिक ओंडरे, सुरेखा विलास गोडसेलवार तसेच आविस शहराध्यक्ष प्रशांत गोडसेलवार, माजी सरपंच विजय कुसनाके, पराजित उमेदवार साईनाथ ओैतकर, राजकुमार गुरनुले, विमल सिडाम, माया येलुरकर, सरिता कांडुरवार, आसमा शेख, विजसलक्ष्मी कामीडवार, आविस कार्यकर्ते ईरशाद शेख, आरफज शेख, प्रकाश दुर्गे, नरेंद्र गर्गम, विनोद रामटेके, जुलेख शेख, कार्तीक तोगम, मिलींद अलोने, शाम ओंडरे, सल्लमभाई, लक्ष्मण आत्राम आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here