आज नगर परिषदेच्या आगामी निवडणूकीसाठी सदस्य आरक्षण सोडत

462

The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक नगर परिषदेच्या आगामी निवडणूकीसाठी सदस्यांच्या आरक्षणाची सोडत आज १३ जून रोजी नगर परिषदेच्या सभागृहात पार पडणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतची नोटीस जारी केली असून या आरक्षण सोडतीसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अंकित हे प्रधिकृत अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. आज १३ जून रोजी सकाळी ११ वाजता ही सोडत काढली जाणार आहे. इच्छुक नागरिकांनी याप्रसंगि उपस्थित राहू शकतात असे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी कळविले आहे. कोणता वार्ड कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी राखीव निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २७ सदस्यसंख्या असलेल्या गडचिरोली नगर परिषदेत १४ जागा हया महिलांसाठी राखीव राहणार आहे. त्यापैकी १० जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी दोन अनुसूचित जाती आणि दोन जागा अनुचूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here