The गडविश्व
गडचिरोली : थंडीचे दिवस सुरू असल्याने थंडीपासून बचाव व्हावा व लहान मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी याकरिता काळसी व तांदासुर येथील प्रत्येक घरात ब्लॅंकेट व लहान मुलांना असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लाइज गडचिरोली तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
हिवाळा ऋतु सुरू झाला असून व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा बंद आहेत याचा विचार करता अलिबाग येथील नंदकिशोर भगत यांनी शंभर ब्लँकेट वाटप करण्याकरिता पाठवले होते. आज सदर ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव एम्प्लाइज हे नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन रक्तदान फळ वाटप वाचनालयासाठी पुस्तके वाटप असे उपक्रम घेत असतात.