– तिघांना अटक
The गडविश्व
वर्धा : गोपनिय माहितीच्या आधारे सापळा कारवाई करत अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतुक करतांना हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने चारचाकी वाहनासह तिघांना अटक केल्याची कारवाई काल ६ मार्च रोजी केली. विठ्ठल देवराव आडे (३०), रोशन गोविंदा मडावी (२२) दोघेही राहणार भटमार्ग ता. बाबुळगाव जि. यवतमाळ, विक्की शिवाजीराव चौधरी (३०) रा. विठ्ठल मंदीर वार्ड हिंगणघाट असे आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथक काल ६ मार्च रोजी पेट्रोलिंग करीत असतांना पथकास मुखबिराकडून वर्धा रोड मार्गे हिंगणघाट येथे दारूची अवैध वाहतुक होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर मार्गावर सापळा रचला असता महेंद्रा कंपनीची सुप्रो मालवाहक एमएच ४० बीएल १८७७ क्रमांकाचे वाहनात देशी विदेशी दारू आढळून आली. यावेळी पोलीसांनी देशी विदेशी दारू व वाहनासह एकुण ९ लाख ९ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तिन्ही आरोपींविरूद हिंगणघाट पोलीस ठाण्यात दारूबंदी कायदयान्व्ये गुन्हा दाखल केला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधीकारी दिनेश कदम यांच्या निर्देशानुसार हिंगणघाट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत चव्व्हाण, सपोनी प्रशांत पाटणकर, यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटिकरण पथकाचे पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, सुहास चांदोरे तसेच सायबर शाखेतील दिनेश बोथकर यांनी केली.