The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील अब्दुल सुभान रमजान शेख यांनी पुणे येथील तडेगाव ड्रीम टाउन फ्लिम स्टुडिओ येथे २९ मे रोजी आयोजित “रायजिंग स्टार डान्स आणि मॉडेलिंग स्पर्धा २०२२” मध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी या स्पर्धेत द्वितीय रनर अप टायटल आपल्या नावी केले आहे.अब्दुल सुभान रमजान शेख यांना बालपणापासूनच कला क्षेत्रात आवड होती. परंतु परिवार आणि शासकीय नौकरी या जबाबदारी मुळे आपला छंद जोपासता आला नाही व तशी संधी सुदधा मिळाली नाही. आज वयाच्या ५० व्या वर्षी साई मॉडेलिंग अकॅडमी कडून मिळालेल्या संधीचे सोन करत जिद्द आणि चिकटी ने गडचिरोली येथे झालेले ऑडिशन देत थेट पुणे येथे ग्रॅण्ड फिनाले गाठुन त्यात मिस्टर कॅटेगिरीतील तरुण स्पर्धकांना मात देत हे यश प्राप्त केले. हा शो ऍक्टर, प्रोडूसर राहुल रेड्डी यांनी आयोजित केलेला होता. यामध्ये प्रमुख पाहुणे प्रतिक्षा बनकर, अनेक मराठी टीव्ही कलावंत उपस्थित होते.
आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला, एटापल्ली, सिरोंच्या, अहेरी तील गुरुजन व मित्र परिवार यांना दिले आहे.
शेख यांच्या यशाने जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एका मनाची भर पडली आहे. शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.