अबब ! तब्बल २०० कोटींपेक्षा अधिकचा गांजा केला नष्ट

351

The गडविश्व
अमरावती : आंध्र प्रदेश पोलिसांनी काल शनिवारी तब्बल दोन लाख किलो गांजा जाळून नष्ट केल्याचा प्रकार समोर आला आहे. बाजारात या गांज्याची किंमत तब्बल २०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. काल शनिवारी दोन लाख किलो गांजा जाळून नष्ट करण्यात आला. राज्य पोलिसांनी सांगितले की, त्यांनी गेल्या काही वर्षांपासून सीमाजिल्ह्यांहून येणारे अमली पदार्थ एकत्रित केले होते. ते नष्ट करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेश पोलिसांनी १२ फेब्रुवारी रोजी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन गांजा जाळण्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, २०० कोटींहून अधिक किंमतीचा गांजा आग लावून तो नष्ट करण्यात आला. इतकच नाही तर पोलिसांनी याचे विशेष पद्धतीने आयोजन केले होते. यासाठी त्यांनी गांजापर्यंत पोहोचण्यासाठी रेड कार्पेटची व्यवस्था केली होती. राज्य पोलिसांनी व्हिडीओ ट्विट करीत लिहिले की, आंध्र प्रदेश पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी. जप्त केलेला तब्बल २ लाख किलो गांजा नष्ट करण्यात आला.
दुसर्‍या ट्विटमध्ये, राज्य पोलिसांनी लिहिले, “आंध्र प्रदेश सरकारच्या आदेशानुसार आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीनुसार, आंध्र प्रदेश पोलिसांनी १ नोव्हेंबर २०२१ रोजी गांजाचा धोका रोखण्यासाठी #ऑपरेशनपरिवर्तन सुरू केले. गांजाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आंतरराज्यीय आणि आंतरविभागीय बैठका सातत्याने घेतल्या जात आहेत, जेणेकरून या सर्वसमावेशक कार्यक्रमाद्वारे समस्या सोडवता येईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here