गडचिरोली : अटक करण्यात आलेल्या नक्षलीस २० जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी

163

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफच्या जवानांनी शुक्रवार १४ जानेवारी रोजी नक्षलविरोधी अभियान राबवून जहाल नक्षली करण उर्फ दुलसा नरोटे यास अटक केली. त्याच्यावर शासनातर्फे 2 लाखांचे बक्षीस होते. काल शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
१४ जानेवारी रोजी गट्टा जंगल परिसरात जिल्हा पोलिस दल व सीआरपीएफ 191 बटालियनचे जवान संयुक्तरित्या नक्षलविरोधी अभियान राबवित असता सदर जंगलपरिसरात जहाल नक्षली असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे जवानांनी अभियान अधिक तीव्र करून शोधमोहीम सुरु केली असता जहाल नक्षली करण ऊर्फ दलसा नरोटे यास अटक करण्यात जवानांना यश आले. जहाल नक्षली करणच्या विरोधात जवळपास 16 गंभीर गुन्हे दाखल आहेत. काल शनिवारी अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षली करणला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 20 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुणावली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here