अटक करण्यात आलेल्या ‘त्या’ नक्षलीस ७ सप्टेंबर पर्यंत पीसीआर

183

– विविध गुन्हे आहे दाखल
The गडविश्व
गडचिरोली, ३० ऑगस्ट : उपविभाग हेडरी अंतर्गत पोमके गट्टा (जां) हद्दीतील झारेवाडा जंगल परीसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना २८ ऑगस्ट रोजी जहाल नक्षली अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे (२७) रा. झारेवाडा ता. एटापल्ली जि.गडचिरोली यास अटक करण्यात आली असून त्याला ७ सप्टेंबर पर्यंत पीसीआर देण्यात आला आहे.
जहाल नक्षली अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे हा सन २०१० साली पेरमिली दलम सदस्य पदावर भरती होवुन २०१३ पर्यंत कार्यरत होता. सन २०१३ पासुन प्लॉटुन क्र. १४ मध्ये कार्यरत होता. ऑगस्ट २०१३ मध्ये सिरोंचा दलममध्ये बदली होवुन २०१८ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होता. मे २०१८ पासुन ते आजपर्यत तो भामरागड दलममध्ये कार्यरत होता. त्याच्यावर ७ खुन, ९ चकमक, २ जाळपोळ, २ दरोडा, ०१ जबरी चोरी व इतर ०३ अशा एकुण २४ गुन्हयामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे याचेवर ०२ लाख रूपये बक्षीस जाहीर केले होते.
उपविभाग भामरागड अंतर्गत येणा­ऱ्या पोमके लाहेरी हद्दीतील कोयार जंगल परीसरात विशेष अभियान पथक (सी-६०) व सीआरपीएफ बटालियन ३७ चे जवान संयुक्त नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जहाल नक्षली अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे याच्यासह रमेश पल्लो (२९) वर्ष रा. कोयार ता. भामरागड व महिला नक्षली तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी (२३) रा. पद्दुर ता. भामरागड जि. गडचिरोली याना सुद्धा अटक करण्यात आली होती. या दोघांवरही विविध गुन्हे दाखल असून महाराष्ट्र शासनाने रमेश पल्लो याचेवर ४ लाख रूपये, तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी हीचेवर ४ लाख रूपये बक्षीस जाहीर केले होते. अटक करण्यात आलेल्या तीन जहाल नक्षलीमधील अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे यास ७ सप्टेंबर पर्यंत पीसीआर देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here