अखेर देसाईगंज तालुक्यातील रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र सुरु

138

– कोरेगाव,किन्हाळा,देसाईगंज येथील केंद्रांचा आमदार गजबे यांच्या हस्ते शुभारंभ
The गडविश्व
देसाईगंज : आदिवासी बहुल नक्षलग्रस्त उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यातील उपजीविकेचे एकमेव साधन असलेल्या धान पिकाच्या खरेदीचे अत्यल्प उद्दिष्ट देण्यात आल्याने येथील खरेदी विक्री सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी धान खरेदीस नकार दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरते धास्तावले होते.ही गंभीर बाब लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंञी ना.छगन भुजबळ यांच्यासह केंद्रित मंञी ना.नितिन गडकरी यांच्याकडे उद्दिष्टांत वाढ करवून देण्याची मागणी केली असता गजबे यांच्या पाठपुराव्यास यश आले असुन ५ जुन रोजी देसाईगंज तालुक्यात धान खरेदी केन्द्रांचा शुभारंभ आमदार गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वडसा सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीचे मॅनेजर पुंडलिक तलमले, उपसभापती अन्नाजी तुपट,अनिल राउत, फुलझले, बुल्ले,सुधिर गायकवाड, क्रिष्णा पुस्तोडे,आबाजी राऊत,आणि कुर्जेकर,झोडे पाटील,मोहण गायकवाड, शेतकरी खरेदी-विक्रीचे सेवा सहकारी संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान खरेदिच्या उद्दिष्ट्यांत वाढ करण्यात येऊन ९ क्विंटल एकरी धान खरेदीच्या निर्धारीत उद्दिष्ट्यांत वाढ करुन एकरी १२ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या धान खरेदीचा मार्ग प्रशस्त झाला आहे.यामुळे शेतकऱ्यांना १९४० रुपये प्रती क्विंटल हमीभावाने धान खरेदी करण्यात येणार असल्याने बरीच मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.तथापी देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव, देसाईगंज,कुरूड येथील ६ जुन पासून धान खरेदी सुरु करण्यात येणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असुन याकरिता सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल आमदार कृष्णा गजबे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here