अखेर ‘त्या’ खुनातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या ; महिला निघाली खुनी

3146

– गडचिरोली पोलिसांनी दोन दिवसात प्रकरणातील खुनीचा घेतला शोध
The गडविश्व
गडचिरोली, ३१ जुलै : शहरातील पोटेगाव मार्गावरील जिलानी बाबा दर्गा च्या पाठीमागील परिसरात इसमाची हत्या करून नालीमध्ये मृतदेह टाकून दिल्याची खळबळजनक घटना दोन दिवसापूर्वी गुरुवार २८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती.या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या घटनेच्या तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत गडचिरोली पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी ही महिला असून ती गडचिरोली शहरातील रामनगर वार्डात राहत असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
वंदना छत्रपती आलाम (४५) असे आरोपी महिलेचे नाव आहे तर नागेश प्रकाश आयलनवार (३५) असे खून करण्यात आलेल्या मृतक इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील पोटेगाव मार्गावरील जिलानी बाबा दर्गा च्या पाठीमागील परिसरात एका नालीत इसमाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला असता मृतकाच्या शरीरावरील जखमेवरून ती हत्या असल्याचे निष्पन्न झाले होते व मृतकाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. दरम्यान काही तासातच त्याची ओळख पटली मात्र खुनी मोकाटच असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक जलद गतीने फिरवत दोन दिवसात या प्रकरणातील आरोपी खुनी च्या मुसक्या आवळल्या आहे. यातील आरोपी महिला वंदना छत्रपती आलाम मूळची वासेरा ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर येथील रहिवासी असून ती गडचिरोली येथे रामनगर वार्डात राहात असल्याचे या प्रकरणातील तपासी अधिकारी सि.बि. चव्हाण यांनी ‘The गडविश्व ‘ च्या प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.
तसेच अधिक माहिती जाणून घेतली असता, नागेश हा मूल येथील रहिवासी असून धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे मामाकडे राहत होता तर काही महिन्यांपूर्वी गडचिरोली शहरात भाडयाच्या घरात राहून विविध हॉटेलमध्ये काम करीत होता. तर यातील आरोपी खुनी ही सुद्धा गडचिरोली येथे भाडयाच्या घरात राहून विविध हॉटेल मध्ये काम करत होती. यातून दोघांची ओळख होती.
नागेश हा गडचिरोली शहरातील एका हॉटेल मध्ये काम करीत होता व त्याला दारूचे अधिक व्यसन होते . दरम्यान पोलिसांनी अधिक माहिती काढली असता तो रामनगर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. तर घटनेच्या दिवशी घरी एकटीच राहत असल्याने नागेश हा रात्रोच्या सुमारास आपल्या खोलीवर आला व आपल्यावर जबरजस्ती करू लागला, कडाक्याचे भांडण झाले व यावेळी त्याला लोखंडी रॉड ने मारून त्याचा खून केला व मध्यरात्री खोलीपासून ३०० मीटर मृतदेह ओढत नेत नालीमध्ये टाकून दिल्याचे आरोपी वंदनाने कबुल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या खुन प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे काय याचा तपास करण्यात येत असल्याचेही तपासी अधिकारी चौहान यांनी सांगितले. महिला आरोपीस अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी सि.बि चौहान, सहायक पोलीस निरीक्षक पूनम गोरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here