The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०९ : जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोंडवांना समिती होचेटोला व मरारटोला यांच्या संयुक्त विद्यमाने मारायमाता चौक, मरारटोला येथे 9 ऑगस्ट 2025 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी आदिवासी देवी-देवतांची विधीवत पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपसरपंच मुरारी हलामी (पन्नेमारा) तर उद्घाटक सरपंच शेवन्ता हलामी होते. पन्नेमारा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गावकरी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सरपंच हलामी यांनी आदिवासी संस्कृती, परंपरा आणि रितीरिवाज जपण्याचे महत्त्व सांगितले. समाज शिक्षणापासून दूर होता, मात्र आता बदलाचे वारे वाहत असून शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. युवा समाजसेवक संतलाल हलामी यांनी हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देताच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमादरम्यान महिलांनी पारंपरिक आदिवासी नृत्य-गाणी सादर केली, तर माजी सरपंच मुरारी हलामी, तागडे सर व संतलाल हलामी यांनीही लोकगीतांचा आस्वाद उपस्थितांना दिला. उपसरपंच प्रकाश हलामी, पोलीस पाटील प्रभाकर हलामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तागडे सर यांनी केले तर आभार संतलाल हलामी यांनी मानले.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #gadchirolinews #WorldTribalDay #Dhanora #Gadchiroli #TribalCulture #TraditionalDance #VillageDevelopment #CulturePreservation #TribalHeritage
#जागतिकआदिवासीदिन #धानोरा #गडचिरोली #आदिवासीसंस्कृती #पारंपरिकनृत्य #ग्रामविकास #संस्कृतीजतन #आदिवासीगौरव
