जागतिक महिला दिना निमित्य कटेझरी येथे महिला मेळावा

185

The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ०८ : तालुक्यातील कटेझरी येथे ८ मार्च २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य भव्य महिला मेळाव्याचे आयोजन कटेझरी पोलिस मदत केंद्रातर्फे करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी उमेश धुर्वे यांनी केले.
प्रमुख अतिथी म्हणून सरपंच कुमारी पल्लवी कोल्हे, गावपुजारी गणपत कोल्हे, बंधूर गावपाटील लालसाय तुलावी आदी उपस्थित होते.
मेळाव्या मध्ये विविध योजनाचा लाभ देण्यात आला तसेच आधार कार्ड कॅम्प, वेगवेगळे कागदपत्र काढून देण्यात आले. त्यामध्ये कटेझरी पोलीस यांनी कटेझरी गावातील एका गरीब कुटुंबात मुलीचा विवाह करून दिला. गरजू लोकांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
सर्व महिलांना पो . स्टे. कटेझरी येथील प्रभारी अधिकारी पो. उपनिरीक्षक अजय भोसले यांनी महिलांचे कायदेविषयक अधिकार, सायबर अवरनेस, गुड टच, बॅड टच, आरोग्यविषयक माहिती असे सखोल मार्गदर्शन केले. दुय्यम प्रभारी अधिकारी पो. उपनिरीक्षक नल्लावार यांनी युवतींना स्पर्धा परीक्षा विषयी माहिती दिली. तर परि. पो. उपनिरीक्षक विक्रांत तळोले यांनी आभार मानले. मेळाव्याला कटेझरी, बंधूर, चारवाही, मर्मा, आदी गावातील ३०० ते ४०० च्या संख्येत नागरिक व महिला यांनी सहभाग घेतला.
पोलिस मदत केंद्रातर्फे भोजन व्यवस्था करण्यात आली. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पोलिस मदत केंद्राच्या सर्व कर्मचारी वृंदानी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here