वाघाचा हल्ल्यात मोहफुले वेचणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू

2467

– घटनास्थळी बघ्यांची झुंबड, वाघ तब्बल तीन तास मृतदेहाजवळ बसून
The गडविश्व
गोंदिया / अर्जुनी (मो) , दि. २३ : मोहफुले संकलन करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने प्राणघातक हल्ला करून ठार केल्याची थरारक घटना रविवारी (दि. २३) रोजी सकाळी शिवरामटोला येथे घडली. या हल्ल्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनुसया धानु कोल्हे (वय ५०) , रा. शिवरामटोला असे मृत महिलेचे नाव आहे.
अनुसया कोल्हे सकाळी गावाशेजारील वनविकास महामंडळाच्या जंगलात (कक्ष क्र. 332) मोहफुले वेचत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने तिच्यावर मागून झडप घातली. वाघाने तिला तब्बल १०० मीटरपर्यंत फरफटत नेले आणि ठार केले.
घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले. आश्चर्याची बाब म्हणजे वाघ तब्बल तीन तास मृतदेहाजवळ बसून होता. त्यामुळे नागरिकांना वाघाचे थेट दर्शन झाले. वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने अथक प्रयत्नांनंतर वाघाला जंगलात परतवले. मात्र, तो पुन्हा घटनास्थळाच्या आसपास फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. या घटनेमुळे शिवरामटोला गावात शोककळा पसरली असून, वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाने हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यासाठी मोहिम सुरू केली असून, नागरिकांना जंगलात एकटे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gonidanews #गोंदिया #शिवरामटोला #वाघाचा_हल्ला #वनविभाग #मोहफुले #गावात_भीती #ब्रेकिंग_न्यूज #TigerAttack #Wildlife #ForestDepartment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here