शिवनी शेतशिवारात रानडुक्कराचा हल्ला : शेतकरी गंभीर जखमी

49

शिवनी शेतशिवारात रानडुक्कराचा हल्ला : शेतकरी गंभीर जखमी
– आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
The गडविश्व
आरमोरी, दि. १७ : तालुक्यातील शिवनी येथील शेतशिवारात रानडुक्कराच्या हल्ल्यात वयोवृद्ध शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. रामचंद्र मातेरे (वय ७९, रा. शिवनी) हे शिवनी–आरमोरी मार्गालगत असलेल्या शेतातील कचरा उचलण्याचे काम करीत असताना दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास रानडुक्कराने अचानक हल्ला केला.
या हल्ल्यात त्यांच्या उजव्या पायासह शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती जखमी शेतकऱ्याचे पुत्र पंढरी मातेरे यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत उपचारासाठी मदत केली. यासोबतच वनपरिक्षेत्र अधिकारी बडोले यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी आरमोरी वनरक्षक पोशेटी पाटील यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्यात आला.
या प्रसंगी शासनाकडून मिळू शकणारी सर्व मदत तातडीने देण्याचे आश्वासन दिलीप घोडाम व कुटुंबीयांना दिले.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम, आरमोरी वनरक्षक पोशेटी पाटील, यशवंतराव खरकाटे, पंढरी मातेरे, मोहित मातेरे, प्रमोद दवै आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here