मच्छरदाणी वापरा, मलेरिया पळवा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : एटापल्ली तालुक्यातील ताडपल्ली येथे मुक्तिपथ शक्तीपथ स्त्री संघटना बैठक नामदेव कंगाली गाव पाटील यांच्या अध्यक्षतेत व किशोर मलेवार तालुका संघटक एटापल्ली यांचे मार्गदर्शनात घेण्यात आली. बैठकीत गावातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते. या बैठकीत मलेरिया पासून बचाव कसा करावा तसेच गावातील अवैध दारूविक्री, तंबाखूचे दुष्परिणाम, हे कसे थांबवता येईल याबाबत सहभागी पद्धतीने चर्चा करण्यात आली.
धोक्याचा मलेरिया व गावात आलय शक्तीपथ हे दोन गाणे समूह पद्धतीने म्हणत उपस्थित सर्वांचा सहभाग घेण्यात आला. मलेरिया आजाराची लक्षणे, उपचार समजावून सांगत मलेरिया आजारापासून दूर राहण्यासाठी नियमित मच्छरदाणीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. सोबतच मच्छरदाणीचा वापर कसे करावे, याबदल प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. आजाराचे लक्षणे आढळल्यास आशा वर्कर किंवा नजीकच्या पीएचसी मध्ये जावे. मलेरिया बाबू किंवा ग्रामपंचायतला गावात फवारणी करण्यास सांगावे, इत्यादि माहिती सांगत. मलेरिया पासून गाव मुक्त करूया हा संकल्प घेण्यात आला.
त्यानंतर शक्तिपथ स्त्री संघटना बैठकित महिलांची कमजोरी, महिला संघटन विषय घेऊन ५५ महिलाना टॉनिक चे गोळ्या देण्यात आल्यात. यावेळी वनिता धर्मा मटामी आशा कार्यकर्ती, बी एम. लेकामी आरोग्य सेविका, व्ही के कंगाली आरोग्य सेविका व गावातील नागरिक उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )
