The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २७ : गडचिरोली मार्गे धानोरा दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास गिरोला फाट्यावर घडली. जखमी युवकाचे नाव निकेश तुलावी (रा. उदेगाव) असे आहे.
निकेश तुलावी हे पत्नी व लहान मुलीसोबत MH 33 Y 9854 क्रमांकाच्या दुचाकीने धानोरा येथे जात असताना दुचाकीचे पेट्रोल संपल्याने ते गिरोला येथे पेट्रोल भरण्यासाठी थांबले. त्याआधी पत्नी व मुलीस बसस्थानकावर बसवून ठेवले होते. पेट्रोल भरून परत येत असताना गडचिरोलीकडून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्याच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.
या अपघातात निकेश गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ सर्च रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने पत्नी व मुलगी बसस्थानकावर थांबलेली असल्याने त्या बचावल्या.
सदर मार्गावरून छत्तीसगड राज्यातील लोहखनिज वाहतूक करणारे तसेच इतर मालवाहू ट्रक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे या ट्रकपैकीच कोणत्यातरी वाहनाने ही धडक दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चातगाव पोलीस करत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #Gadchiroli #Dhanora #Giroli #RoadAccident #BikeAccident #UnknownTruck #SeriousInjury #TrafficIncident #AccidentNews #GadchiroliPolice #गडचिरोली #धानोरा #गिरोला #अपघातवार्ता #दुचाकीअपघात #अज्ञातट्रक #रोडअॅक्सिडेंट #गंभीरजखमी #वाहतूकअपघात #गडचिरोलीपोलीस
